परिचय
अवघड गोष्ट सोपी करून सांगणारा प्रशिक्षक
युवराज गायकवाड हे युवराज गायकवाड ट्रेनिंग इन्स्टिट्यूटचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. पब्लिक स्पीकिंग, व्यक्तिमत्त्व विकास, नेतृत्व विकास, सूत्रसंचालन, विक्री कौशल्य, अभ्यास आणि परीक्षा तंत्र, स्मरणशक्ती आणि व्यवसाय वृद्धी या विषयांवर ते गेली 16 वर्षे काम करत आहेत.
त्यांच्या शिकवण्याचं वेगळेपण एका शब्दात आहे: सोपेपणा. अवघड गोष्टी अशा पद्धतीने सांगितल्या जातात की माणूस त्या दुसऱ्याच दिवशी आयुष्यात वापरू शकतो. कार्यशाळेत लेक्चर कमी आणि स्टेजवरचा सराव जास्त. Teach Less. Make Them Speak More.
व्यक्तिमत्त्व विकासावरील 5,000 हून अधिक पुस्तकांचं वैयक्तिक ग्रंथालय त्यांच्याकडे आहे. ते उत्तम वक्ते आहेत, आणि त्याहून चांगले श्रोते.
स्पीकर प्रोफाईल डाउनलोड करा (PDF)
संस्थापक, यश पब्लिकेशन्ससदस्य, Trainers Association of India3 पुस्तकांचे लेखक
पहिलं भाषण
15 ऑगस्ट, इयत्ता तिसरी
हाफ पँट घातलेला एक लहान मुलगा शाळेच्या स्टेजवर उभा होता. समोर संपूर्ण शाळा. आणि त्याचे पाय थरथरत होते.
मागून बाई हळूच सांगत होत्या:
"युवराज, बोल!"
त्या दिवशी तो कसाबसा बोलला. पण त्याने बोलणं कधीच सोडलं नाही. आज तोच मुलगा 12,000 पेक्षा जास्त लोकांना स्टेजवर आत्मविश्वासाने उभं राहायला शिकवतो.